Durgaveer Pratishthan icon

Durgaveer Pratishthan

Smirks Tech
Free
10+ downloads

About Durgaveer Pratishthan

इतिहास हा खर तर सर्वात जास्त उपेक्षित विषय पण आपला इतिहास हा सह्याद्रीच्या भुगोलाशी निगडित आहे. इथल्या दुर्गम दुर्गांशी आणि प्राचीन संस्कृतीशी आहे. डोंगरी किल्ले, वनदुर्ग, भुईकोट, पाणकोट असे विविध प्रकारचे किल्ले असलेला अवघा महाराष्ट्र हाच किल्ल्यांचे एक संग्रहालय आहे. महाराष्ट्रातल्या बहुसंख्य किल्ल्यांचा संबंध छत्रपति शिवाजी महाराजांशी जोडला जातो. शिवकाळात ‘संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग’ हा विचार प्रकर्षाने जाणवतो. सातवाहन, राष्टकूट, शिलाहार, बहमनी, मोगल आणि पोर्तुगीज यांचा दुर्गबांधणी मधला सहभाग दुर्लक्ष करण्याजोगा नाही. पण शिवकाळ हा किल्ल्यांची उभारणी व त्यांचा उपयोग यांचा सुवर्णकाळ होता. दुर्गबांधणीतल्या तंत्राचा परमोच्च अविष्कार शिवदुर्गरचनेत आढळतो. म्हणूनच ब्रिटीश पर्यटक डग्लस म्हणतो, “शिवाजीचे वास्तव्य डोंगरी मुलुखातच होते व त्याचे सामर्थ्य डोंगरी प्रदेशाच्या भरवश्यावरच होते. तो ख़राखुरा दुर्गस्वामी होता. त्याचा जन्म दुर्गात झाला. त्याला जे वैभव प्राप्त झाले ते दुर्गांच्यामुळे आणि त्याच्या दुर्गाना जे सामर्थ्य प्राप्त झाले तेही त्याच्याच प्रयत्नाने झाले. त्याचे दुर्ग म्हणजे भारतातील त्याच्या शत्रूंना धाक होता. त्याच्या राष्ट्राची ती संवर्धनभूमी होती. त्याच्या विजयाचा तो पाया होता. त्याच्या वाढत्या महत्वाकांक्षेचा तो जिना होता. दुर्ग हेच त्याचे निवासस्थान व तेच त्याच्या आनंदाचे निधान होते. कित्येक दुर्ग त्याने स्वतः बांधले आणि जे आधी बांधलेले होते, त्यासर्वांना त्याने बळकटी आणली.” महाराष्ट्रातील किल्ले, देवळं, लेणी, ऐतिहासिक स्मारकं यांची संख्या कित्येक शेकडयांच्या घरात आहे. लहानपणापासून या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळताना शिवरायांच्या कथा ऐकत आपण मोठे होतो.

डोंगर, किल्ले, नद्या, जंगल हे कधी आपल्याला वेगळे वाटतच नाही. सगळीकडे आपल्या आठवणी विखुरलेल्या. आई वडिलांसोबत कधीतरी दूर जंगलात,किल्ल्यांवर किंवा तीर्थक्षेत्री केलेली भटकंती (ज्याला आज ट्रेकिंग म्हणतात) पिढयानपिढया आपल्यात रुजलेले आहे. अशा या पर्वतरांगांमध्ये फिरता फिरता अनेक लोक आपल्याला भेटतात. अनेक गोष्टी उलगडत जातात. किल्ल्यांवर जाणार्‍यांच्या लिखाणात अन् बोलण्यात हे किल्ले पुन्हा पूर्वीसारखे बांधायला हवेत, असा सूर अनेकदा उमटतो. वाचकांना अन् श्रोत्यांनाही तसंच वाटू लागतं; पण आपल्या दैनंदिन जीवनाकडे वळलं, की हा विषयही डोळ्यांआड होतो. वस्तुस्थितीत काहीच फरक पडत नाही.

याच वस्तुस्थितीला छेद देत काही दुर्गप्रेमी एकत्र येऊन या दुर्गांच्या संवर्धन-संरक्षणासाठी “दूर्गवीर प्रतिष्ठान” या दुर्गप्रेमी संस्थेची स्थापना केली. आपल्या दैनंदीन जीवेनातील व्याप संभाळून सोबतच या दूर्गसांपदेचे संरक्षण करण्याचा वसा दूर्गवीर प्रतिष्ठानच्या सर्व तरुणांनी घेतला आहे. परंतु महाराष्ट्रातील ३५० हून आधिक दूर्गसांपद संभाळने हे एकटया-दुकटया माणसाच्या आवाक्यातील गोष्ट नाही. या साठी गरज आहे ती प्रत्येक मराठी माणसाच्या सहकार्याची. आपल्या सर्वांच्या श्रमांतुनच ही गतवैभवाची साक्षीदार असणारी तीर्थक्षेत्रे भविष्यात राष्ट्रतेजाची प्रेरणास्तोत्रे बनतील.

Durgaveer Pratishthan Screenshots