श्री गुरुपुरुषोत्तम माहात्म्य icon

श्री गुरुपुरुषोत्तम माहात्म्य

Teja Bhat
Free
100+ downloads

About श्री गुरुपुरुषोत्तम माहात्म्य

श्री दादा महाराजांचा परिचय

श्री.दादा महाराज ह्यांचा जन्म जळगाव प्रांतात ज्येष्ठ अधिक महिन्याच्या वद्य त्रयोदशीला झाला.त्यांचा जन्म अधिक महिन्यात झाल्यामुळे त्यांचे नाव पुरुषोत्तम/धोंडू असे ठेवले. आईचे नाव
सौ. आनंदी व वडिलांचे नाव श्री.श्रीधरशास्त्री नाटेकर.

श्री.दादा महाराज ह्यांना गृहस्थाश्रमात अजिबात गोडी नसल्यामुळे, त्यांनी त्यांचे गुरू श्री.सदगुरु गोविंद महाराज बर्वे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली पद्मालय येथे सिद्धीनायकासमोर कठोर उपासना केली.
ह्या खडतर उपासनेनंतर त्यांनी तळमळीने समाजहित साधण्यास सुरुवात केली. हे समाजसेवेचे सत्कार्य करत असताना त्यांनी त्यांचे शिष्य श्री.भाऊ उंब्राणीकर ह्यांना अनुग्रह दिला.

श्री.दादा महाराजांच्या सूचनेनुसार श्रीमती सरस्वती ( माई ) गाडगीळ ह्यांनी भक्तांना श्री.दादा महाराजांविषयी आलेले विविध अनुभव शब्दांकित करून पोथीचे (श्री गुरुपुरुषोत्तम माहात्म्य ग्रंथ ) लिखाण केले.

सदर हस्तलिखित पोथीला श्री.दादा महाराजांनी हस्तस्पर्ष करून पोथी पावन केली आणि ती.माईंना श्रीफळ देऊन आशीर्वाद दिला.

परंतु सदर पोथीचे अधिकृत अनावरण करण्यापूर्वीच दिनांक १ मे १९७७ (नृसिंह जयंती ) रोजी त्यांना देवाज्ञा झाली.
श्री सद्गुरू गोविंद महाराज शिष्य , श्री दादा महाराजांच्या सर्व भक्तांना श्री गुरुपुरुषोत्तम माहात्म्य ग्रंथ (२१ अध्याय) तसेच स्तोत्रे उपलब्ध आहेत.
।। श्री गुरुपुरुषोत्तम माहात्म्य ग्रंथ ।।

अध्याय २१
श्रीमती सरस्वती गाडगीळ लिखित
स्तोत्र
१. हृद् गत
२. ग्रंथ पठणाची फलश्रुती व ऋणनिर्देश
३. दुर्वांकुर
४. श्री सद्गुरू पाठ
५. श्री सद्गुरुस्मरण
६. श्री सद्गुरूंचें आवडतें भजन
७. श्री सद्गुरूंची आरती १
८. श्री सद्गुरूंची आरती २
९. श्री सद्गुरूंची काकडआरती १
१०. श्री सद्गुरूंची काकडआरती २
११. श्री सद्गुरूंची मानस पूजा
१२. श्री सद्गुरुस्तवन
१३. श्री सद्गुरूस्तुती
१४. अभंग १
१५. अभंग २
१६. भूपाळी

श्री गुरुपुरुषोत्तम माहात्म्य Screenshots