Anil Rahudkar icon

Anil Rahudkar

Swaraj IT Services
Free
50+ downloads

About Anil Rahudkar

चला उद्योग करू या – माझ्या या नवीन चळवळी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे . उद्योग करण्याविषयी तुमच्या मनात आलेला हा विचार लाख मोलाचा आहे. त्यामुळेच इथून पुढे ह्या विचाराला योग्य ते वैचारिक खतपाणी घालून मोठे करणे गरजेचे आहे. असे म्हणतात की, विचार डोक्यात जास्त वेळ ठेवल्याने टिकत नाही त्यामुळेच लवकरात लवकर स्वतःचा उद्योग करायचा ह्या तुमच्या विचाराला कृतीमध्ये आणणे गरजेचे आहे व त्यासाठी मी तुम्हाला निर्णायक मदत करणार आहे.

असं समजा उद्योग म्हटलं की, आपल्या ग्रामीण भागामध्ये अनुभवाची कमतरता, सातत्याने नकारात्मक लोकांची टोमणे ह्या सामान्य बाबी आहेत. ज्याप्रमाणे शालेय यश मिळविण्यासाठी योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे , त्याचप्रमाणे उद्योग करण्यापूर्वी जर यशस्वी उद्योजक बनण्यासाठीचे मूलभूत ज्ञान अनुभवी व यशस्वी मार्गदर्शकाकडून घेता आले तर ह्या नवीन आव्हानात्मक क्षेत्रामध्ये तुमचे यश नक्की झालंय असं समजा.

मी, अनिल राहुडकर माझा अल्पसा परिचय देतांना एवढच सांगेल की, मी माझ्या शालेय जीवनापासून कुटुंबाची आर्थिक गरज म्हणून इयत्ता आठवीपासून उद्योगा मध्ये शिरलो. ‘ कमवा व शिका ‘ ह्या उक्तीप्रमाणे अतिशय हलाखीच्या आर्थिक परिस्थिती वर मात करून उच्च शिक्षण घेतले . माझं जीवनात खुप मोठं यश मिळवायच हे ध्येय असल्यामुळे ह्या प्रवासात आलेल्या असंख्य संकटा पैकी , अडचणीपैकीं कोणतीच गोष्ट मला हताश करू शकली नाही . मी जीवनामध्ये भरीव यश मिळविण्यासाठी एक दीर्घ लढा दिला व त्यामध्ये यशस्वी झालो.

शिक्षण, व्यवसाय व कुटुंबाची जबाबदारी सांभाळत केलेल्या मेहनतीला यश आले व जाने. 2009 मध्ये मी ‘ स्टेट बँक ऑफ इंडिया ‘ मध्ये रुजू झालो. तसं पाहिलं तर स्टेट बँकेमध्ये नोकरी लागणं हे यश माझ्या साठी मोठं होत, कारण रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास करून हे यश मी संपादन केलं होतं. यश मिळवीत कुणी माणूस कुठपर्यंत आला, ह्या पेक्षा तो कुठून- कुठपर्यंत ,किती खडतर मार्ग पार करून आला हे महत्वाचं असत. एवढ्या दीर्घ संघर्षानंतर कदाचित मी शांत आरामाच जीवन जगू शकलो असतो, परंतु मित्रांनो ज्याला मेहनतीची सवय लागली ना तो स्वस्थ बसू शकत नाही. त्यामुळे माझ्या कुटुंबातील व परिसरातील युवकांना मदत करून त्यांना उद्योगातून मोठं करण्याचं मी ठरवलं. मी साधारणतः पूर्ण एक तपापासून उद्योग ह्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे. ह्या दरम्यान परिसरातील अनेक उद्योगांचा अभ्यास करून सखोल अनुभव संपादन केले. स्वतः अनेक उद्योगामध्ये सहभाग नोंदविला. कुटुंबातील व परिसरातील अनेक युवकांना यशस्वी उद्योजक होण्यासाठी यथोचित मार्गदर्शन व सहकार्य केले.

ह्या संघर्षमयी प्रवासात आलेले अनुभव लाख मोलाचे आहेत. माझ्या जीवनातील महत्वाचा काळ मी ह्या साठी गुंतविला आहे व त्यामुळेच माझ्या ग्रामीण भागातील हजारो बांधवापर्यंत पोहचून त्यांच्यासाठी ‘ उद्योग ‘ ह्या आव्हानात्मक क्षेत्राची दरवाजे खुली करून देण्याचे एक मोठे आव्हान पेलण्याचा संकल्प मी घेतला आहे व त्यासाठीच ” चला उद्योग करू या !” ही एक नवीन ‘ युवा चळवळ ‘ महाराष्ट्रामध्ये मी सुरू केली आहे. ह्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील ध्येयवादी, होतकरू, मेहनती, उद्योग करण्यास उत्सुक असणाऱ्या सर्व युवा मित्र मैत्रिणीना, उद्योग करण्यासाठी आवश्यक सखोल मार्गदर्शन व पाठबळ ” चला उद्योग करू या !” ह्या चळवळीतून उपलब्ध करून देण्याचा माझा प्रामाणिक हेतू आहे.

Anil Rahudkar Screenshots