Dhar Pawar Social icon

Dhar Pawar Social

WE33RAS IT PVT LTD
Free
50+ downloads

About Dhar Pawar Social

इतिहासात डोकावताना वास्तवाच पण भान बाळगणे आवश्यक असते. आपल्या पवार कुटुंबियांना शिवजयंती रथ उत्सवानिमित्ताने एकत्र आणणे, एकमेकाबद्दल माहिती करून घेणे, आपसात संबंध वृद्धींगत करणे, शक्य झाल्यास एकमेकांना मदत करणे, समाज उपयोगी काम करणे आणि किमान आपल्या भावी पिढीला आपल्या दैदिप्यमान इतिहासाची जाणीव करून देणे हा या कार्याचा उद्देश आहे.

आपण सर्व धार पवार कुटुंबीय एका वंशाच्या धाग्याने बांधले गेलो आहोत. आपल्या घराण्याला फार प्राचीन परंपरा लाभली आहे. सिकंदराच्या आक्रमणाला पहिल्यांदा सामोरे जाणारा आणि त्याला या भूभागात घुसू न देणारा राजा पौरस पण पवार वंशीयच. त्याप्रमाणे सम्राट विक्रमादित्य, महाराजा भोज यांसारखे पराक्रमी सम्राट, नवनाथांपैकी एक असलेले राजा भर्तृहरीनाथ यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा वारसा लाभलेले पवार किंवा परमार घराणे.