वचन संजीवनी - Vachan Sanjivani icon

वचन संजीवनी - Vachan Sanjivani

Technomind Creations Pandharpur
Free
1,000+ downloads

About वचन संजीवनी - Vachan Sanjivani

ॐ श्री गुरु बसव लिंगाय नमः

कन्नड भाषेतील साहित्याचा कळस म्हणजे 'वचन साहित्य'.लिंगायत धर्म बसवण्णांनी स्थापन केला पण तो धर्म वाचवण्याचे काम वचन साहित्यामुळे झाले, वचन साहित्य हि एक 'संजीवनीच' आहे म्हणावे लागेल. 12 व्या शतकात कल्याण राज्यात 'अनुभव मंटप' नावाची संसद बसवण्णांनी स्थापन केली त्यामध्ये काश्मीर पासुन कन्याकुमारी पर्यंतचे लोक आकर्षित झाले. तेथे रोजच्या जीवनात घडणाऱ्या घडामोडींवर चर्चा होत असत. समाजातील विषमता, उच्च-नीच भेदभाव, स्त्री - पुरूष भेदभाव, अंध्श्रद्धा, अनिष्ट रूढी परंपरा, यावर खंडन करून सरळ आणि सोप्या पद्धतीने जीवन जगण्याचा मार्ग शरणांनी मांडला, आणि ही परंपरा हजारो वर्षे सर्वांना अनुकरण करता यावे म्हणून वचनांचा उदय झाला असावा. लिंगायत धर्मातील वचन साहित्यामुळे दिन - दलितांच्यावर होणारे अन्याय झुगारून दिले. स्त्रीयांना समान हक्क मिळवून दिले, मंदिरात प्रवेश नसल्याने देहच देवालय बनवीले. कायक, दासोह ही परीकल्पना रुढ झाली. आणि खऱ्या अर्थाने लिंगायत धर्मीय सुखाने जगू शकले. त्यामुळे वचन साहित्याला 'संजीवनी' असेच म्हणावे लागेल.
नंतर कल्याण क्रांती झाली. या संस्कृतीला मुळातून उपटून काढण्याचे प्रयत्न झाले. पण आपल्या पूर्वजांनी, बसवादी शरणांनी आपले प्राण पणाला लावून वचन साहित्याचे रक्षण केले. हे वचन साहित्य पुर्णपणे कन्नड भाषेत आहे. परंतु 1कोटी पेक्षा जास्त लिंगायत हे मराठी भाषिक आहेत. त्यामुळे त्यांना आपला इतिहास कळावा, वचन साहित्य वाचावे, यासाठी मराठी भाषेतील 'वचन', वचन सिध्दांत सार, बसवण्णांची वचने अशी हजारो वचने भाषांतरीत करण्यात आली आहेत. यातील निवडक वचने आम्ही ''वचन संजीवनी'' या अँड्रॉइड मोबाईल अॅप्लिकेशन बनवीण्याचे प्रयत्न केला आहे. आजच्या मोबाईल जमान्यात हे आवश्यक आहे. म्हणून आम्ही. हे संकलन केले आहे. यामध्ये चुका झाल्या असतील तर क्षमा असावी. सल्ला द्यायचा असेल तर खालील मोबाईल नंबर वर मॅसेज अथवा फोन करावा.


श्री.सिद्राम कवळीकट्टी - 8421368036.

श्री.अभिषेक देशमाने - 9822054291.

शरणु - शरणार्थी.

वचन संजीवनी - Vachan Sanjivani Screenshots