माठ लागवड #Agrownet™ icon

माठ लागवड #Agrownet™

𝗔𝗴𝗿𝗼𝘄𝗻𝗲𝘁™
Free
1+ downloads

About माठ लागवड #Agrownet™

माठ लागवड माठाला मध्यम काळी व निचऱ्याची जमीन लागते. ती दोनदा नांगरून हेक्टरी सु. वीस टन शेणखत घालून, कुळवून तिच्यात ३·६ X १·८ मी. चे वाफे करतात. बी फार बारीक असल्यामुळे ते वाफ्यात सर्वत्र एकसारखे पसरविण्यासाठी त्याच्यामध्ये बारीक, कोरडी माती समभाग मिसळून ते मुठीने वाफ्यात हेक्टरी ४·५ किग्रॅ. प्रमाणात फोकतात. दाताळ्याने वाफ्याच्या मातीत मिसळून घेतात. पहिले पाणी फार काळजीपूर्वक देतात. दुसरे पाणी ३–४ दिवसांनी आणि पुढे ६–७ दिवसांनी देतात. बी टाकल्यापासून ४–५ आठवड्यांत रोपे भाजीसाठी काढतात. हेक्टरी ५०,००० ते ६०,००० किग्रॅ. पालेभाजी मिळते. तांबड्या माठास ७ ते ८ महिन्यांनंतर, तर हिरव्या माठास ५ ते ६ महिन्यांतच बी येते. पेरणीपासून भाजी ६ आठवड्यांत तयार होते. वनस्पतीची वाढ बारमाही असल्याने दर तीन आठवड्यांनी खुडणी करून ५ ते १० वेळा खुडण्या घेता येतात. वर्षभर भरपूर उत्पन्न देणारी ही भाजी आहे. ही जास्त पावसाच्या प्रदेशात पावसाळ्यानंतर पेरतात.

वरचेवर पेरणी करावी लागू नये व एकदा पेरल्यावर बऱ्याच खुडण्या व्हाव्यात म्हणून माठाचा को–३ हा परसबागेसाठी योग्य असा प्रकार मिळविण्यात आला आहे. त्याचे पीक वर्षभर घेता येते व ते ९० दिवसांपर्यंत टिकते. तो ९०–११० सेंमी. उंच वाढतो व त्याला १२–१५ फांद्या येतात. त्याची पेरणी दोन ओळींत २० सेंमी. अंतर ठेवून करतात व १५–२० दिवसांनी २० सेंमी अंतरावर एक झाड ठेवून विरळणी करतात. पहिली खुडणी २० दिवसांनी करतात व पुढे दर आठवड्याला एक याप्रमाणे किमान १० खुडण्या होतात. ९० दिवसांत बी तयार होते व एका झाडापासून १५–२० ग्रॅ.बी मिळते. या प्रकाराचे हेक्टरी ३०,००० किग्रॅ. पालेभाजीचे उत्पन्न येते.

को–३ जातीच्या पाल्यात १७–३५% भरड तंतू, १२% प्रथिने, ३·२% पोटॅशियम, २·४८% कॅल्शियम, ९·८४% लोह व ०·४७% फॉस्फरस; तसेच १०० ग्रॅ. पाल्यात ३५·९९ मिग्रॅ. क जीवनसत्त्व व ११·०४ मिग्रॅ. कॅरोटीन ही असतात.

माठ लागवड #Agrownet™ Screenshots